Skip to main content

Posts

Featured

श्रीखंड

श्रीखंडाचा शोध  ज्यांनी कुणी लावला असेल त्यांना माझा त्रिवार मुजरा!! (अनेक पदार्थांचा शोध कसा लागला असेल त्याच्या गोष्टी लिहायच्यात कधीतरी मला)... चक्क्याचा शोध आधी लागला असेल कि श्रीखंडाचा? म्हणजे "अर्रे दह्यात साखर घालून फार छान लागतं.. आपण दह्यातलं पाणी काढून टाकून साखर घातली तर?" असा प्रश्न आधी पडला असेल कि "अर्रे माझी आई घट्ट दही आवडतं म्हणून आई कधी कधी दही चक्क  टांगून ठेवते... म्हणून आम्ही त्याला चक्का म्हणतो...त्या चक्क्यात साखर घालून खाल्ली तर?" असा प्रश्न आधी पडला असेल?  इन एनी केस श्रीरंगची आई फार स्मार्ट! घीवर, पुरणपोळ्या, करंज्या, जिलबीसारखे लाड करत बसण्यापेक्षा मुलाला दही-साखरेची सवय आणि गोडी लावली... वरून स्पेशल फिल करवण्यासाठी नावही "श्रीखंड" दिलं.  श्रीरंगच्या आईप्रमाणे माझं लग्न झाल्यावर मी नवऱ्याला "आमच्याकडे सणासुदीला श्रीखंडच लागतं" हे पटवून दिल्यामुळे किमान गुढी पाडवा आणि दसरा हे श्रीखंड स्पेशल असतात. होळी आणि श्रीखंड हे समीकरण मी स्वतःलाही पटवून देऊ शकत नाही.  लहान असताना जेव्हा बाबा चक्का घेऊन यायचे त

Latest Posts

पोळीचा लाडू (Policha Ladoo)

सफरचंद किवी स्मुदी (Apple Kiwi Smoothie)

स्मुदी सिझन (Smoothie Season)

दोडका आणि मेथीची भाजी (Dodka Methi Bhaaji)

गाजराचे घावन (Gaajarche Ghaavan)

मऊभात (MauBhaat)

अल्फाल्फा बटाटा भाजी

काहीतरी

Sourdough Bread

आमटी भात