स्मुदी सिझन (Smoothie Season)





स्प्रिंग झालाय बाबा सुरु आता.. म्हणजेच साधारण उन्हाळाही सुरु होत आलाय इथे... पुणा-मुंबईसारखं मरणाच उकडत नसलं तरी उन्हाळा आहे हे जाणवतं बे एरियात.. आणि म्हणूनच आता स्मुदी सिझन सुरु झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. 

जगात काहीही झालं तरी त्याचा "गार-गोड" खाण्याशी संबंध कसा जोडता येईल,  हे मी कायम बघत असते. म्हणजे काही चांगलं झालं तर 'celebration तो बनता है ' म्हणून.. आणि काही वाईट झालं तर to cope up with म्हणून.. "गार-गोड" खाणं आवश्यक असतं. तसं पूर्वी मी लाजायचे नाही , कॅलरीज वगैरेंची तमा बाळगायचे नाही. पण आता ह्या सगळ्याकडे लक्ष देणारा नवरा मिळाल्यामुळे मलाही बघावं लागतं अधूनमधून... ह्याचमुळे स्मुदीज बद्दल मला प्रेम वाटायला लागलं. 

गार-गोड म्हणजे साखर आणि दुध ह्याच दोन मेन इंग्रिडीएंटनी बनतं हा माझा अनेक वर्षांचा गैरसमज एकदा स्मुदी प्यायल्यावर गायब झाला. Smoothies म्हणजे साधारणपणे एकत्र ब्लेंड केलेल्या भाज्या, फळं (काहीवेळा त्यात दुध-दही - बटर वगैरे घालतात पण ते आवश्यक सामग्रीत येत नाही) 

सध्या ब्रेकफास्टसाठी मी बऱ्याचदा स्मुदी करत असते. आरोग्यदायी वगैरे ठीके.. पण किती लवकर आणि किती कमी कष्टात होते अरे.. तर आज मी ट्रोपिकल स्मुदी केली होती. अननसाचा रस, पपई, थोडंस आलं आणि वरून थोडीशी सुकामेवा पूड... हे सगळं मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये थोडं फिरवून घेतलं कि झाली स्मुदी तयार.. 





मस्त न? जरा जरा फोटोपण जमायला लागलेत न? जमतील हळू हळू.. तोवर रोज स्मुदी करून फोटो काढत राहेनच !

Comments

Popular Posts