शुभं भवतु

"हे काय अजून एक ब्लॉग?" ... हो , काढला अजून एक, फुकट आहे आणि त्यामुळे पौष्टिकही..

"का?" ... कारणं तशी आहेत खूप, पण महत्वाची काही कारणं आहेत:

  1. रोज रोज माझी आई आणि माझ्या सासूबाई मला फोनवर विचारतात "आज काय मग?"... मी काय करत्ये स्वयपाकात ह्याबद्दल सगळ्यांना अतीव उत्सुकता असत्ये हल्ली... त्यामुळे आता त्यांनी विचारलं कि मी त्यांना उत्तर देण्याऐवजी विचारणार "तुम्ही माझा ब्लॉग वाचलात?" .. आता अर्थातच मी काय रोज पोस्ट करणार नाहीये, पण त्या दोघी तरी रोज कुठे बघणारेत?
  2. "अमुक तमुक भाजी करत्ये" असं उत्तर दिल्यावर एकारांती कोकणस्थ आई सांगते "थोडी चिंच गुळ घाल त्यात" आणि देशावरल्या सासूबाई म्हणतात "आमच्या अमोलला ना तिखट आवडते, थोडा कांदा लसूण मसाला घाल".. त्या मिसळणाच्या डब्याला मसाल्याचा डबा म्हणतात, तिखटाला मिरची, कुळीथाला हुलगा आणि अजून बरंच काय काय..  त्यातून आता ह्या नवीन देशात आल्यावर इथे अजून वेगळंच काही काही आहे... त्यामुळे मी सध्या प्रचंड शिकत्ये, सगळ्या पद्धतींची सांगड घालायचा प्रयत्न करत्ये. आणि त्यातच तरलेले आणि फसलेले अनुभव नोट करून ठेवायचेत मला.. म्हणून ....
  3. एक पुस्तक आणलं परवा लायब्ररीतून "What Katie Ate" ... ते Motivation आहे सध्यातरी.. माझ्याकडे चांगला camera नाहीये... पण तो येईपर्यंत "The Best Camera is one you have with you" म्हणायचं.. 
  4. रोज स्वयपाक करताना माझा अर्धा वेळ आणि अर्धी शक्ती बडबडण्यात जाते. कारण अगदी "दही" लावत असले तरी त्याच्याभोवतीच्या हजार गोष्टी सांगत असते मी अमोलला.. त्या हजार मधल्या ८-१० गोष्टी लिहून ठेवाव्या वाटलं म्हणून...
"इथे रेसिपीज मिळतील का?".... आईचा घो! अजिबात मिळणार नाहीत... दिसतील... वाटेल कि रेसिपीज आहेत... पण त्या नसतील.. तरी खूप शूरवीर असाल आणि करून बघाव्याश्या वाटल्याच तर "Try it on your risk वगैरे" 

Whatever...

Comments

Popular Posts