आमटी भात


मी गेल्यावेळी एकदा जास्वन्दीवर "सुरणाची भाजी" नावाची पोस्ट लिहिली होती. त्यात मी जे लिहिलं होतं तेच इथे परत लिहिणारे .. कारण ते परत परत लिहावं इतकं जास्त मनापासून वाटत असतं मला.

 एकदा अश्विनीने मला विचारलं होतं की "तुझ्यामते स्वर्ग म्हणजे काय?"
मी लगेच उत्तर दिलं होतं..."स्वर्ग आपल्या हिमालया सारखा दिसत असेल, मस्त background music असेल, सगळे हसरे आणि त्यामुळे सुंदर दिसणारे चेहरे असतिल आणि महत्वाचं म्हणजे आज्जीच्या हातचं जेवण असेल"
आज्जी.. बेस्ट कुक होती माझी. तिच्या हातचा खालेल्ला पहिला पदार्थ मला आठवत नाही. पण सर्वात जास्तवेळा आणि सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणजे चिंच-गुळाची आमटी... कितीतरी जास्त आवडते मला ही आमटी.. इतकी जास्त कि "किती जास्त आवडते" हे लिहायचंही सुचत नाहीये.. बास्स भूक लागल्ये प्रचंड मला..


so as we have discussed earlier, no good camera= no good photos. हे दर पोस्टला लिहायचं कारण माझा नवरा हा ब्लॉग वाचतो आणि तो मला camera  घेऊन देणारे.

तर मी काल आणि आज आमटी भात केला होता. हो दोन दिवस सलग... अमोलला आवडणार नाही असं वाटत होतं त्यामुळे काल मी फक्त माझ्यापुरती आमटी  केली दुपारी. ह्यामागे अजून २ कारणं होती :

१. मला एकटीला सगळी आमटी मिळेल.
२. त्याला दिलीच आणि त्याला आवडली नाहीच तर मला तो आवडणं कमी होईल.

पण मग त्याच्यासाठीही केली.. घेतली तितकी रिस्क... आणि आवडली असं म्हणाला तरी निदान, त्याला वाटत होतं आवडणार नाही पण मग २-३दा घेऊन जेवला.. काही लोकांना चिंच-गुळाची आमटी आवडत नाही.. पण ना त्यासाठी फार पूर्वी एक म्हण बनल्ये "गा.गु.च.का?"
:)

ही आमटी हा जगातला अजून एक "लई सोप्पा पण लई टेस्टी" पदार्थ आहे. कुकरमध्ये भातासोबत डाळही लावायची.. माझे बाबा आणि आता माझे सासरे  मला कायम सांगतात "डाळ आधीपासून भिजवून ठेवायची असते" तर हां, ते करायचं.. मी ३ शिट्ट्या मोजते.. आणि मग वरण झालं कि फोडणी करायची त्यात वरण घालायचं, पाणी घालायचं . चिंच-गुळ-मीठ जरा व्ययस्थित उकळून झाल्यावर घालायचं आणि मग अजून  उकळून घ्यायचं.. डन! मी जनरली अश्या पदार्थांमध्ये जिथे मला "तिखट" चव जास्त नकोय त्यात मसाला घालत असते थोडासा.. आणि ह्या आमटीत आय प्रिफर "आगरी मसाला" ..अर्रे कसला बेस्ट असतो तो.. आत्तातरी एका काकूंनी दिलेला मसाला वापरत्ये. तो संपला कि मी करणारे स्वतः ट्राय, तेव्हा टाकेनच त्याचा अनुभव..

 काल दुपारी अक्षरशः आमटी-भात ओरपला मी.. इथे के.प्र चं लोणचं मिळालं आंब्याचं आणि आईने पाठवलेली  सांडगी मिरची.. मस्तपैकी ताक-भात कालवला आणि वर आमटी... स्वर्ग!

तर ना आमच्या सासरी, आमटीला "फोडणीचं वरण" म्हणतात... मला हे माहीतच नव्हतं, सासूबाई २-३दा म्हणाल्या होत्या मला "दादांना फोडणीचं वरण आवडतं" .. मी वरणाला वरून लसूण-मिरचीची फोडणी दिली होती फक्त तेव्हा...

आज्जी मला मस्त भात कालवून द्यायची.. माझी आज्जी आणि बाबा इतके मन लावून भात जेवणारी माणसं आहेत ना... बाबांच्या हातचा दही-दुध-मिरची-भात किंवा पोहे.. अहाहा.. त्यावर लिहुयातच पोस्ट.. तर आत्ता आज्जीबद्दल बोलत होतो, आज्जी मीठ-भात मस्त मळून घ्यायची.. त्यावर जरासं ताक आणि मग विचारायची "धरण हवं कि विहीर?" मी विहीर मागायचे जास्त करून.. आजी भाताची विहीर करायची मग आणि त्यात आमटी घालायची... मी अमोललाही तसंच करून दिलं मग.. आज्जीसारखी चव नक्कीच नव्हती आली.. पण मी आज्जी होईपर्यंत जमेल असं वाटतंय चांगली आमटी करणं.

हे इतकं वाचून दाखवलं तेव्हा अमोल म्हणला.. खूप तुटक आणि random  लिहिल्यासारखं वाटतं आहे.. i know..  कारण ना मला खरंच खूप भूक लागल्ये.. आणि मी आत्ता रात्रीचा १ वाजलेला असला तरी जाऊन आमटी गरम करून घेऊन आमटी भात जेवणारे.




Comments

Popular Posts